जालना - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महारष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा -2022 दि.8 ऑक्टोबर 2022 रोजी जालना शहरातील खालील उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
मत्सोदरी शिक्षण संस्था, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, औरंगाबाद रोड, नागेवाडी, जालना, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, नागेवाडी, औरंगाबाद रोड, जालना, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, नवीन एम.आय.डी.सी. जवळ, औरंगाबाद रोड, जालना, अंकुशराव टोपे महाविद्यालय, मोती बागेजवळ, जुना जालना, श्री. सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, टाऊन हॉलजवळ, जुना जालना, सी.टी.एम. के. गुजराथी हायस्कूल मुथा बिल्डिंग जवळ, सरोजिनी देवी रोड, जालना, श्री. एम.एस. जैन (इंग्रजी माध्यम) फुलंब्रीकर नाट्यगृहाजवळ, जालना, श्री. एम.एस. जैन (मराठी माध्यम) गणेश नगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना, नुतन महाविद्यालय, छत्रपती कॉलनी, जुना जालना, श्री. आर.जी. बगडिया, आर्ट ॲन्ड एस.बी. लाखेटिया कॉमर्स ॲन्ड बेन्जान्जी सायन्स कॉलेज, दुर्गा माता रोड, जालना, उर्दु हायस्कुल ॲन्ड उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट ॲन्ड सायन्स, मोती बाग रोड काली मस्जिद समोर, जुना जालना, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल जे.ई.एस. कॉलेज जवळ, जालना राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) देऊळगावराजा रोड, जालना, राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय देऊळगावराजा रोड, जालना सेंटमेरी हायस्कुल, देऊळगावराजा रोड, जालना श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, श्री.गणपती नेत्रालय जवळ, देऊळगावराजा रोड, जालना.
वरील केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वर नमुद केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात येत आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांना फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारान्वये वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार हा आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. हा आदेश दि. 8 ऑक्टोबर 2022 चे सकाळी 9.00 वाजेपासुन ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी आदेशीत केले आहे.
-*-*-*-*-*-
