अस्तंबा यात्रेत 30 स्वयंसेवकांची नियुक्ती, डीजे बँड वाजण्यावर बंदी
धडगाव : दिवाळी पर्वातात होणाऱ्या तालुक्यातील अस्तंबा यात्रेच्या तयारी आणि नियोजनासाठी अस्तंबा गावातील उमेदवार आणि अस्तंबा यात्रा समितीची तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आताच्या अस्तंबा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक काळात तसेच अस्तंबा यात्रेत कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही, याची सूचना देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. अस्तंबा यात्रेत गावातील 30 स्वयंसेवक नेमावेत. यात्रेत डी. जे. साउंड व बँड वाजवले जाणार नाहीत. याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. तसेच गावकऱ्यांनी आपल्या गावातील निवडणूक शांततेत पार पाडावी अशा सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी यात्रेत लावण्यात येणारे बंदोबस्त व पार्किंगची व्यवस्थे बाबत पाणीसह कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्थबाबत पाहणी करून अस्तंबा व असली गावातील मतदान केंद्र -बूथला भेट दिली. बैठकीत ज्ञानेश्वर सपकाळे, पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण, नायब तहसीलदार उकरडे, बिट अंमलदार पोना दिपक वारुळे, पो. हे. पुष्पेंद्र
कोळी, पोहे जयेश गावित, विवेक नागरे, ग्रामसेवक मानसिंग वळवी, पोलीस पाटील आंबालाल वसावे, कविता पोपट वसावे, माझी सरपंच वनसिंग वळवी तसेच आदी अस्तंबा ग्रामस्थ या ठिकाणी अस्तंबा यात्रेच्या तयारी व नियोज साठी च्या बैठकीत उपस्थित होते.

