जालना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आणि बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने” महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जालना.(RSETI) येथे बेरोजगारासाठी घरगुती विद्युत उपकरण दुरूस्तीचे निवासी मोफत तीस दिवसाचे प्रशिक्षण दि. 10 ऑक्टोबर 2022 वार सोमवार पासुन सुरुवात.
“ ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आणि बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने” महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सतकर कॉम्प्लेक्स पहिला मजला अंबड रोड जालना. ता. जि. जालना. येथे दि. 10 ऑक्टोबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान बेरोजगारासाठी घरगुती विद्युत उपकरण दुरूस्तीचे निवासी तिस दिवसाचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ जालना जिल्ह्यातील बेरोजगार घेऊ शकतात प्रशिक्षणासाठी उमेदवार बेरोजगाराचे,वय 20 ते 45, वयोगटातील, 10वी 12वी पर्यन्त शिकलेले व उमेदवारला स्वत:ला स्वयंरोजगाराची आवड व कामाची प्राथमिक माहिती असावी ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल त्यासाठी कुटुंब दारिद्र्य रेषेखालील मुळ प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणात मुख्य विषयासोबतच, घरगुती विद्युत उपकरणाचे संपुर्ण प्रात्यक्षिकासह ,व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य, व्यावसायिक गुणवत्ता, आरोग्य,योगासने,व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येते. प्रशिक्षण मोफत असुन प्रशिक्षणा दरम्यान निवास,जेवण,चहा या सोयी विंनामूल्य पुरविण्यात येतात. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत आणावी.व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. 1) शाळा सोडल्याचा दाखला 2) गुणपत्रक 3)आधार कार्ड 4) पॅन कार्ड 5)मतदान कार्ड 6) शिधापत्रिका 5) पासपोर्ट साईज चार फोटो 6) मनरेगा जॉब कार्ड 7)रोजगार नोंदणी कार्ड 8) दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र वरील सर्व मुळ झेरॉक्स प्रतीसह वरील पत्यावर उपस्थित राहावे असे संस्थेचे संचालक श्री मंगेश डामरे हे कळवितात.
-*-*-*-*-*-
