कडूस येथे ग्रामसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत जात प्रमाणपत्र शिबीर संपन्न


कडूस येथे ग्रामसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत जात प्रमाणपत्र शिबीर संपन्न



पुणे : कर्वे समाज सेवा संस्था व ईएनपीआरओ कंपनी आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील कडूस येथे ग्रामसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत जात प्रमाणपत्र शिबीर पार पडले. यात ६०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

ग्रामसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत कर्वे समाज सेवा संस्था व ईएनपीआरओ कंपनी आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील कडूस, दोंदे, वेताळे आणि सायगाव या चार गावाच्या पंधरा ठाकरवस्ती मध्ये विविध विकास कामे चालू आहे. त्यात कडूस गावातील रुकेदरा, तेलदरा, गोडंबा, धामनमाळ, पोशिदरा, बंदावने शिवार या वाड्यांचा तर दोंदे गावातील आवळ्याची वाडी, सैदानी वाडी, हडवडे वाडी, तळ्याची वाडी तसेच सायगाव मधील सायगाव वस्ती व सायगाव तळ्याची वस्ती आणि वेताळे गावातील मांजरवाडी,उपळेवाडी आणि रानमळा रामनगर अशा पंधरा वस्त्यांचे समावेश आहे.

या गावामध्ये आदिवासी ठाकर लोकं राहत असून या आदिवासींना कागदपत्रामुळे शिक्षणासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. जातीचा दाखला व इतर दाखला मिळत नसल्याची गैरसोय होत असल्याने ग्रामसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत जात प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे सीएसआर डायरेक्टर डॉ. महेश ठाकूर, ईएनपीआरओ चे रणजित सिंग, रोटरी क्लब चे सीएसआर हेड कल्याणी कुलकर्णी, प्रकल्पाचे व्यवस्थापक रुपेश पवार यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.महेश ठाकूर यांनी केले. कल्याणी मॅडमांनी या उपस्थितांना शिबिराचे महत्व पटवून दिले. शिबिरात खेड तहसील पुनर्वसन विभागाचे नंदकुमार तारडे, खेड महाई सेवा अजय ठोकड उपस्थित होते. तसेच दोंदे गावचे सरपंच चंद्रकांत बारणे, तलाठी मगर, कडूस तलाठी राठोड, महाईसेवा गणेश गारगोटे यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाला. या शिबिरात ग्रामसमृद्धी प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक रुचिका पवार, क्षेत्रकार्य समन्वयक शुभम भालेराव, लक्ष्मण पावरा यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार