डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड तर सुहास वेशा नाईक यांची उपाध्यक्षपदी निवड
नंदुरबात :नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नाट्यमयीत घडामोडी घडून भाजपाच्या डॉ. सुप्रिया विजयकुमार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर सुहास वेशा नाईक यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षपूर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपा चा झेंडा फडकवला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दि.17ऑक्टोबर 2022 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांना 31 मते तर, adv. सिमा वळवी यांना 25 मते मिळाली त्यामुळे डॉ. सुप्रिया गावित यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी सुहास नाईक यांना 31 मते तर adv. राम रघुवंशी यांना 25 मते मिळाली त्यामुळे सुहास नाईक यांची उपाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाचे 20 मते, काँग्रेस चे शहादा तालुक्यातील हेमलता शितोळे, अक्कलकुवा तालुक्यातील सुयान बी. मकरांनी, निमलबाई नटवर पाडवी, तळोदा तालुक्यातील सुहास नाईक, नवापूर तालुक्यातील सदस्य प्रकाश कोकणी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गणेश पराडके, शंकर आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँगेसचे शहादा तालुक्यातील मोहन शेवाळे तर नवापूर तालुक्यातील सुनिल गावित, धर्मसिंग वसावे, सुशिला कोकणी यांनी मतदान केल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली.

