डॉ. उत्कर्षा पाटील यांचा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत सत्कार
डॉ. उत्कर्षा पाटील यांचा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत सत्कार
नंदुरबार :दि.२२ऑक्टोबर 2022 महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा संघटक गणेश पाटील, कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या हस्ते डाॅ.उत्कर्षा मधुकर पाटील बी.एच.एम.एस पदवी अनंतराव कणसे मेडिकल कॉलेज पुणे येथून अ श्रेणीत प्राप्त केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक श्री. मधुकर पाटील, सौ. सविता पाटील, प्रज्वल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. उत्कर्षा पाटील यांनी मनोगतात सांगितले की, आजची माॅर्डन जगाची परिस्थिती फार भयानक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीत शरीराची अधोगती सुरु झाली आहे. स्वतःच्या शरीराची उत्तम काळजी घेता आली पाहिजे. सुज्ञ बना, व्यायाम करून शरीर निरोगी ठेवा. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी उत्तम पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक आहे. भविष्यात मानसिक रुग्णांसाठी फ्री योगा शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत असे मत व्यक्त केले.

