महाराष्ट्र पोलीस भरती होण्याचे स्वप्न बघत असाल तर ही माहीत तुमच्यासाठी


 महाराष्ट्र पोलीस भरती होण्याचे स्वप्न बघत असाल तर ही माहीत तुमच्यासाठी

मुबई - महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- 2021 पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई/ वाहन चालक  पोलीस शिपाई, संवर्गातील एकूण 17130 पदांकरीता भरती प्रक्रिया दिनांक 03 Nov 2022 पासून प्रत्यक्ष सुरुवात होत असून सदरील पोलीस भरतीची जाहिरात दिनांक 1 NOV 2022 रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

सदरील भरती प्रक्रियेत पोलीस आयुक्त कार्यालय, 

बृहन्मुंबई , ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नागपूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर, सोलापूर शहर, लोहमार्ग मुंबई आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर,  कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, पुणे लोहमार्ग, औरंगाबाद लोहमार्ग आदी पोलीस घटकांचा समावेश आहे. मात्र सदरील भरती प्रक्रियेत बीड, लातूरम उस्मानाबाद, नंदुरबार सारख्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला दिसून येत नाही.

पोलिस शिपाई पत्रक लाल बटन दाबून सविस्तर बघा👇https://in.docworkspace.com/d/sII7RlqmYAdqh6poG?sa=e1&st=1t


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार