स्वतंत्रअमृत महोत्सवीवर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार पदभरतीसाठी शिथीलता केवळ 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. बघा कोणत्या विभागात कीती पदभरती

 

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये  नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळे देशाच्या  अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काहीदिवसात ही वेगवेगळ्याविभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील. मात्र नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्तनिर्णय होताना पाहायला मिळाले. पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कसं करणार याकडेसगळ्यांचे लक्ष लागलंय. कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार  ज्या विभागांचा/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे.  ज्या विभाग/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग/कार्यालयांतील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे.  वरील(अ) आणि (ब) प्रमाणे शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 अन्वये करण्यात येईल. 

आरोग्य खाते – 10 हजार 568 ,गृह खाते – 14 हजार 956 ,ग्रामविकास खाते – 11,000, कृषी खाते – 2500, सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337, नगरविकास खाते – 1500,जलसंपदा खाते – 8227,जलसंधारण खाते – 2,423

पशुसंवर्धन खाते – 1,047,


 रिक्त जागा , गृहविभाग- 49 हजार 851,सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822,जलसंपदा विभाग : 21 हजार 489 ,महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557, वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432, सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12, आदिवासी विभाग : 6 हजार 907, सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार