एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यातील नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी 8 नोव्हेंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड


 तळोदा :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे होणार आहेइंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी 150 जागांसाठी लक्षांक प्राप्त झाला असून प्राप्त लक्षांकापैकी 65 लाभार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट निवड होणार असून उर्वरित 85 जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. यात धडगाव तालुक्यासाठी 34, अक्कलकुवा 31 तर तळोदा तालुक्यासाठी 20 विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येईल. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान आपले आदेश कार्यालयातून घेवून जावून ज्या शाळेत विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या शाळेत प्रवेश घ्यावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा बदलून मिळणार नाही. यावर्षी इयत्ता दुसरीच्या प्रवेशासाठी लक्षांक अप्राप्त असल्याने निवड प्रक्रिया होणार नाही.

तालुकानिहाय ईश्वरचिठ्ठी निवड प्रक्रीयेची वेळ तळोदा तालुक्यासाठी सकाळी 11 ते 12-00 वाजता, अक्कलकुवा दुपारी 12 ते 1-00 तर धडगांव तालुक्यासाठी दुपारी 1 ते 2-00 वाजेदरम्यान राहील. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणार नाही त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रवेशासंबंधी कार्यवाही करावी. निवड प्रक्रियेबाबत सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांनी राहील. असे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार