मंत्रालय मुंबई येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव तसेच राजभवन येथे राज्यपाल कार्यालयात ही निवेदन

राज्यपाल व मुख्यमंत्री कार्यालयात यांना निवेदन दिले.


मुंबई : दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालय मुंबई येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले. तसेच राजभवन येथे राज्यपाल कार्यालयात ही निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,

प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे:-

१.कोकण भवन, औरंगाबाद व नाशिक येथील माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा तातडीने भरा. तुंबलेली 90 हजार द्वितीय अपीले तातडीने निकाली काढा.

२. कार्यरत आयुक्त निवृत्त होण्यापूर्वीच नवीन आयुक्त निवड प्रक्रिया पूर्ण करून ठेवा. आयुक्तांचे पद रिक्त ठेऊ नये. आयुक्तांची निवड निवृत्त न्यायाधीश, समाजसेवक, पत्रकार या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची व्हावी.

३. जनमाहिती आणि प्रथम अपील अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ चे प्रशिक्षण सक्तीचे व अनिवार्य करा.

४.शासकीय कर्मचारी व नागरिकांसाठी माहिती अधिकार प्रशिक्षण व प्रचारासाठी निधीची पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करा.

५. सर्व जनता व नागरिकांमध्ये माहिती अधिकाराचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून पुस्तके, व्हिडिओ, चित्रपट, अभ्यास साहित्य असे प्रचार साहित्य जनतेसाठी मोफत उपलब्ध करून द्या.  

६. माहिती अधिकार अधिनियम २००५ चा विध्यार्थ्यांना सुलभ व सुबोध परिचय व्हावा म्हणून शालेय अभ्यासक्रमात समावेश करा.

निवेदनात वरील विषयाची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाण हुन ४० कार्यकर्ते उपस्थित होते.

 


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार