धडगाव : नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती पदासाठी गणेश पराडके यांची निवड जिल्हा परिषद कार्यालयात घोषणा करण्यात आली आहे .धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश पराडके यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती निवड झाली आहे . सदर निवड ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया ताई गावित यांनी केली आहे.यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेच्या सभापती संगिता गावित हेमलता शीतळे, शंकर पाडवी यांच्यासह पद अधिकारी, सदस्य, तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.

