धडगाव : धडगाव तालुक्यातील खरवड ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरदार पावरा यांची थेट जनतेतून सरपंचपदी निवड झाली होती. तर मंगळवारी उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत रतन वसावे यांची निवड झाली. विशेष म्हणजे, उपसरपंचपदी २४ वर्षीय तरुणाची निवड झाल्याने परिसरात कौतुक होत आहे.
तालुक्यातील खरवड येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी लालसिंग पावरा व रतन वसावे हे दोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात रतन वसावे यांना पाच तर लालसिंग पावरा यांना तीन मते मिळाल्याने रतन वसावे यांना विजयी घोषित करून उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे जाहिर केले.
यासाठी निवडणुक अधिकाऱ्यांसह सरदार पावरा यांनी काम बघितले. या प्रसंगी होमा वसावे, इला वसावे, थावऱ्या पावरा व सरदार पावरा यांच्यासह येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

