खा.डॉ. हिना गावित व जि.प.अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते 882 लाभार्थ्यांना गॅस शेगडी वाटप


तळोदा :- तळोदा येथे परिसरातील 792 लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला -२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ. हिना गावित व जि प अध्यक्ष सुप्रिया ताई गावित यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी खा.डॉ. हिना गावित म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना तळागाळातील महिलापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच महत्त्वकांक्षी उज्ज्वला योजना २ ही बंद पडलेली पुन्हा सुरू करून चुलीवर स्वयंपाक करायला महिलांना घरधुरमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न आहे व उर्वरित महिलांनी डिसेंबर अखेर पर्यंत गॅस जोडणी योजना सुरू राहणार आहे . बचत गटातून माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून महिला सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल तसेच वेगवेगळ्या वस्तू तयार करून त्या मेट्रो सिटीमध्ये विक्री करून महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्रातून योजना आणत तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित यांनी केले. तळोदा येथे परिसरातील 882 लाभार्थ्यांना विकास पर्व प्रधानमंत्री उज्वला -२ योजनेअंतर्गत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी त्या बोलत होत्या केंद्र शासना कडून वेगवेगळ्या योजना खासदार हिना गावित यांच्या माध्यमातुन घरोघरी स्वयंपाकासाठी गॅस शेगडी पोचवण्याचे कार्य सुरू आहे.आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन मिळाले आहे. राजकीय विरोधकांनी केंद्राच्या अनेक विकासाच्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला मात्र यशस्वी झाल्या नाहीत. जिल्ह्यातील महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहे.बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्याचे प्रयत्न करण्या येत आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सन्मानासाठी शासनाने अनेक योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न गावित परिवाराकडून सातत्याने होत आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना-2 अंतर्गत तळोदा तालुक्यातील ८८२ लाभार्थ्यांना संसदरत्न खासदार डाँ हिनाताई गावित,जिल्हा परिषद अध्यक्षा डाँ सुप्रियाताई गावित,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास दादा नाईक,यांच्या हस्ते गँस शेगडीचे वाटप करण्यात आले,याप्रंगी पं स सदस्य दाज्या दादा पावरा,किरण गँस एजन्सीचे मालक किरण पवार,मालदा सरपंच करूणा पावरा,किरण गँस एजन्सीचे,मँनेजर ज्योतीताई कासार,गोपी पावरा,दिपकभाऊ पाडवी,प्रतिकभाऊ जैन,चिनोदा सरपंच राजू पाटिल,दलेलपूर सरपंच राजू प्रधान,काजीपूरचे सरपंच कैलास पाडवी,न्यू बनचे सरपंच अजय ठाकरे,आदि पदाधिकरी व मोठ्या सख्येंने लाभार्थी उपस्थीत होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार