नाशिक :- नाशिक येथील अयोध्या हॉटेल सातपूर येथे भ्रष्टाचार पर्दापाश आंदोलन अंतर्गत संविधान आर्मी संघटना नाशिक जिल्हा मेळावा मोठ्या उत्साह संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन संविधान आर्मी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व संविधान रक्षक सैनिक जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते संविधान ज्योत पेटवून करण्यात आले. संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष आंदोलनकारी नेता जगन भाई सोनवणे यांच्या संविधान निर्मिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सातपूर येथून ढोल ताशांच्या गजरात संविधानाचा विजय असो, तिरंगा जिंदाबाद, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आशा गगनभेदी घोषणा देत सातपूर ते आयोध्या हॉटेलपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. अयोध्या हॉटेल या ठिकाणी नाशिक जिल्हा संविधान गौरव महिला मेळावा संपूर्ण झाला. या मेळाव्याचे उद्घाटन संविधान आर्मी संघटनेचे राष्ट्राध्यक्ष जगन भाई सोनवणे सोनवणे यांच्या हस्ते संविधान ज्योत पेटवून करण्यात आले. मेळाव्याच्या प्रारंभी संविधान प्रास्ताविक सामूहिक रित्या वाचन करण्यात आले. सदर मेळाव्याची राष्ट्रगीत म्हणून सांगता करण्यात आली. या मेळाव्याचे आयोजक मार्गदर्शक संविधान आणि महिला आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष संविधान रक्षक सैनिक वंदनाताई काळे, तसेच संविधान आर्मी नाशिक विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संविधान शिक्षक सैनिक सतीश गांगुर्डे, महाराष्ट्र सचिव मायाताई काळे, जिल्हा सचिव रंजना बागुल, तालुकाध्यक्ष भारती जोशी, शहराध्यक्ष रंजना पुराणे, सातपूर तालुकाध्यक्ष प्रियंका केदारे, दिंडोरी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, अंजना काळे, रंजना मोरे, रंजना कांबळे, मनीषा साळवे, वर्षा जाधव, विद्या मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

