भारतीय ट्रायबल टायगर सेना तळोदा तर्फे गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा यांना निवेदन


तळोदा :- तालुक्यातील मौजे गाव धवळीविहीर येथील आरोग्य उपकेंद्र ईमारत बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करण्यात यावे या संदर्भात भारतीय ट्रायबल टायगर सेना चे पदाधिकारी व धवळीविहीर गावाचे ग्रामस्थ यांच्याकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, निवेदन अर्ज सादर करतो की मोजे गाव धवळीविहीर ता.तळोदा येथे आरोग्य उपकेंद्र ईमारत चे बांधकाम सुरू करण्यात आले होते इमारत बांधकाम विषयी काही त्र्युटया फरशी बसविणे.काम व कामयोग्य रितीने दर्जेदार व्हावे अशी तक्रार गावकऱ्यानी दाखल केली होती तक्रारीनंतर चोकशी होऊन पुन्हा इमारत बांधकाम सुरू करणे आवश्यक होते परंतु एक दिड वर्ष पलटून सुधा काम सुरू झालेल नाहित,तरी आरोग्य उपकेंद्र इमारत चे काम त्वरीत चोवकशी करून  योग्य रितीने कामाची सुरुवात करण्यात यावी जेणे करून गावतील गावकरी आरोग्यापासून वंचित राहू नये. याची नोंद घेऊन धवळीविहीर उपकेंद्राचे इमारत काम त्रुटीचे पूर्तता करून संबधित ठेकेदारास काम पूर्ण करण्यासाठी आदेश देणे असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.जितेंद्र पावरा तालुका अध्यक्ष BTTS तळोदा,राजु प्रधान जिल्हा युवा अध्यक्ष BTTS नंदुरबार,दिलीप पावरा तालुका उपाध्यक्ष BTTS तळोदा,कपिल गावित तालुका युवा अध्यक्ष BTTS तळोदा,आपसिंग पावरा,बियालाल पावरा,दिलीप पावरा, नटवर पावरा, बबन पावरा, जान्या पावरा, निलेश पावरा, विलास पावारा, सोनुप पावरा , जया धानका आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार