नाशिक :- जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेले विकास कामाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या व सुरु असलेल्या विकास कामांचा अहवाल 'बदल घडतोय बदल दिसतोय " या पुस्तकाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्य अहवाल सादर करताना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे व युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांची उपस्थिती होती.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामाचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर
ट्रायबल मंच लाईव्ह न्यूज नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल मो.7263819977

