नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्यांचे कामे पूर्ण न झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उप विभाग नांदगाव व ठेकेदार यांच्या विरोधात बोलठाण येथे दिनांक 16 जानेवारी 2023 सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी दिली आहे.
बोलठाण घाट माथ्यावरील सर्वच रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत असून सदर रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांनी लक्ष घालून पूर्ण केल्यामुळे या रस्त्याची जवळ सर्वसामान्य नागरिक वाहनधारक यांना बसत आहे.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील रस्त्यांची कामे मंजूर असताना देखील अपूर्ण अवस्थेत आहेत. याबाबत ठेकेदार यांना फोन द्वारे विचारले असता त्यांनी सांगितले की, मला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची बिलच मिळाले नाही त्यामुळे सदरचा रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे बोलताना सांगितले असून सदर रस्त्याचे काम लवकर सुरू करेल अशी माहिती दिली.
परंतु बोलठाण ते रोहिले बुद्रुक हा रस्ता दोन ते चार वर्षापासून मंजूर असून देखील त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. याला सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव हेच जबाबदार असल्याचे सिद्ध होत असून त्यामुळे या रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामामुळे सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 पासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात होणार आहे.

