नांदगाव तालुक्यातील जळीतग्रस्तांसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून गृह संसार उपयोगी वस्तूंची भेट

 ट्रायबल मंच लाईव्ह न्यूज नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल मो.7263819977

नाशिक:- जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील दोन कुटुंबीयांच्या झोपडीत आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या कुटुंबीयांना नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांच्या पत्नी सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते गृहसंसार उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली. त्यात भांडे, कपडे अन्नधान्य भेट देण्यात आले .नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील ऊसतोड कामगार विलास श्रावण सोनवणे, सखुबाई विलास सोनवणे यांच्या झोपडीला आग लागून सर्व संसार जळून खाक झाला होता. तसेच पळशी येथील साहेबराव भावडू गायकवाड यांचे देखील मोठ्या प्रमाणात संसाराची हानी झाली होती. या दोन्ही कुटुंबांना दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शुक्रवारी आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांना कपडे, गॅस शेगडी, संसार उपयोगी भांडे, गहू आणि तांदूळ देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, विलास आहेर, राहुल वाघ, अनिल पवार, प्रकाश आव्हाड, रंगनाथ आव्हाड, सौ. रोहिणी मोरे, सौ संगीता आणिल पवार सौ निराली राहुल वाघ, आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार