ट्रायबल मंच लाईव्ह न्यूज नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल मो.7263819977
नाशिक :- नाशिक शहरात असलेल्या सातपूर भागातील राधाकृष्ण नगर आशापुरी निवास बोलकर पोलीस चौकी समोर राहत असलेल्या वडिलांसह दोन मुलांनी कर्जाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घरी कुणीच नसताना सातपूर भागात राधाकृष्ण नगर आशापुरी निवास बोरकर पोलीस चौकीसमोर राहत असलेले दीपक शिरोडे वडील वय वर्ष 55, मोठा मुलगा प्रसाद शिरोडे वय वर्षे 25, तर राकेश शिरोडे वय वर्ष 23 यांनी एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोलीमध्ये फॕनचे हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. दीपक शिरोडे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री व्यवसाय करतात. दरम्यान पत्नी व आई यादेखील दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या घरी आल्यावर हा सर्व प्रकार लक्षात आला. सदरची माहिती पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल. पुढील तपास पोलीस करत आहेत

