शिरपुर :- तालुक्यातील नवागांव गावातील पाण्याची समस्या तातडीने सोडविणे बाबत जितेंद्र पावरा यांनी दि- 3/2/2023 रोजी ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे अर्जाद्वारे मागणी केली होती. तसेच दि- 13/2/2023 रोजी जिल्हा परिषद धुळे व पाणीपुरवठा विभागाला निवदेन सादर करण्यात आले होते त्याची अखेर शासनाने दखल घेऊन नवागाव गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर ची मोटर ग्रामपंचायत ने एका महिन्यात दुरुस्ती करून आणल्याने नवागांव गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर ने अखेर नवागांव गावाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नसल्याचे स्पष्ट झाले तसेच ह्या गंभीर समस्यांवर जितेंद्र पावरा यांनी वारंवार ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या शी चर्चा व पाठपुरावा करुन तातडीने पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याने समस्त गावकर्यांनी जितेंद्र पावरा व शासनाचे आभार मानले.

