बिरसा फायटर्सची मोर्चा संदर्भात बैठक संपन्न

      (आदिवासींच्या विविध प्रश्नावर चर्चा)

तळोदा :-  आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय अधिकार मंच यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या मोर्चा संदर्भात बिरसा फायटर्सची मिटिंग कनेक्श्ववर मंदिर तळोदा येथे पार पडली.बोगस आदिवासी,डिबीटी,आश्रम शाळा,वसतिगृहातील प्रश्न,ग्रामीण भागातील शिक्षण,आरोग्य,विविध कल्याणकारी योजनेतील भ्रष्टाचार या विविध विषयावर चर्चा करून,१० फेब्रुवारीचा मोर्चात जास्तीत जास्त बिरसा फायटर्स कार्यकर्ते,समाज बांधव सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी ऑनलाईन सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष भरत पावरा,तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालुका सहसचिव सतीश पाडवी,कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,नवापूर तालुका सचिव प्रशांत वसावे,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,धजापाणी शाखाध्यक्ष डोंगरसिंग पावरा,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,पिंपरबारी शाखाध्यक्ष अजय वळवी,खर्डी बुll उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी,तुळाजा शाखाध्यक्ष प्रदिप पटले,चंद्रसिंग तडवी,दिवाल्या ठाकरे,अनिल वळवी,दिनकर वळवी,अनिल ठाकरे, शिवराम वसावे,उद्या ठाकरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार