काठी :- अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे आज जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इतर पिकांचे व भाजीपाला चे सुद्धा नुकसान झाले आहेत. या अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काठी गावात रस्त्यावर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या ईशारा देण्यात आला आहे.या पावसामुळे खरबुच, डांगर, मका, गहू, हरभरा, भगर,हरा मुंग, दादर, आणि इतर पिक भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे आज जोरदार पाऊसाची हजेरी
अक्कलकुवा (काठी ) प्रतिनिधी