रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावीत

 तळोदा :- २ मार्च दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी 2 मार्च 1943 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक गंभीर जखमी झाले होते . कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या एका कवितेत मराठी वीरांची ऐतिहासिक घटना सांगताना लिहून ठेवले होते की , ' दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा , ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा " अशीच काहीशी भावना या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मारकास भेट देऊन मनात येत होती. याठिकाणी जिल्हा परिषद नंदुरबार अध्यक्षा डॉ . सुप्रियाताई विजयकुमार गावित, समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटिया, आप श्री जितेंद्र पाडवी महाराज, आप श्री प्रेम पाडवी महाराज, आप श्री संजय ठाकरे महाराज, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, रतिलाल पावरा, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, गणेश पाटील, किसन महाराज, नारायण ठाकरे, यशवंत पाडवी, प्रवीण वळवी, रतिलाल ठाकरे तसेच यावेळी महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश येथील असंख्य बंधू - भगिनी यांनी उपस्थिती लावली. सामुदायिक रीतीने स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रियाताई गावित यांनी 1942 साली महात्मा गांधी आदेशित केलेल्या चलेजाव चळवळीचा काळ या चळवळीत खान्देशातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग झालेल्या रावला पाणीच्या स्वातंत्र्यसंग्रामात शहीद झालेले स्वातंत्र्यवीरांची आठवण करून दिली. आप श्री गुलाब महाराजांचे व्यसन मुक्ती व समाज संघटन सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. रावला पाणी संग्रामात शहीद झालेल्या क्रांतिवीरांची आठवण राहावी यासाठी शहीद स्मारक उभारले जाईल असेही सांगितले. समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटिया यांनी नंदुरबार जिल्ह्यातील देशाचे स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळी आंदोलने सत्याग्रह त्यासाठी भोगलेला कारावास यांचाही संक्षिप्त आढावा, रावलापाणी चा संग्राम तळोदा तालुक्यातील मोरवड येथे आप श्री संत गुलाब महाराज यांनी आदिवासी समाजाचे तात्कालीन परिस्थिती पाहून समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थनेच्या माध्यमातून पारतंत्र्याचा काळ असूनही त्या दुर्गम भागात आदिवासी बांधव एकत्र येऊन अहिंसा आणि सदाचाराची शपथ घेत होते. कोणत्याही प्रस्थापित नेत्याशिवाय सुरू असलेली एकमेव चळवळ, सुसंघटितपणे सुरू असलेली सुधारणावादी चळवळ, सोयीप्रमाणे लाखोंच्या संख्येने आत्मोधार व सामाजिक सुधारणेच्या मांडवाखाली आदिवासींना एकत्र आणून नवक्रांती घडविणारे शिल्पकार गुलाम महाराज ठरले. यानंतर चळवळीची सर्व सूत्र गुलाम महाराजांचे भाऊ श्री रामदास महाराज यांनी घेतली याविषयी माहिती दिली. उपस्थित सर्व बांधवांची भोजनाची सोय करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार