शिरपुर तालुक्यातील :- बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव पाड्यासाठी सन 2021 मध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या स्मशानभूमीचे कामाला 3 वर्ष पूर्ण झाले असून देखील आजही नवागांव येथील स्मशानभूमी चे बांधकामास सुरुवात झाली नाही म्हणुन प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र पावरा युवा कार्यकर्ता यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना अर्जाद्वारे मागणी करण्यात आली.निवदेन म्हटले आहे की, वरील विषयानुसार दि:-10/2/2023 रोजी ग्रामपंचायत ला ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे अर्जाद्वारे मागणी केली असुन देखील या विषयावर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने आज दि :- 17/3:2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना विनंती अर्ज सादर करतो की,१५ वा वित्त आयोग निधीतून नवागांव पाडयसाठी शासनाने रु. ५०२२७८ निधी देखील मुंजर केले असून कामाचा कालावधीत देखील सप्टेंबर २०२१ / डिसेंबर २०२१ पर्यंत देण्यात आला होता परंतु आता सन २०२१/२०२२/२०२३ चे कृतीआराखडयातील कामे मंजूर झाले असून देखील सन २०२१ चे नवागांव स्मशानभूमीची काम कोणत्याही प्रकारे सुरू करण्यात आलेले नाही तसचे पाण्याचा दिवासतात जर गावातील कोणाचाही मुत्यु झाला तर पाऊस सुरू असल्याने गावकऱ्यांचा त्या मुत्यु झालेल्या व्यक्तीला अत्यविधी करण्यासाठी भरपूर समस्या निर्माण होत असल्याने प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुन संबंधित कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र पावरा युवा कार्यकर्ता यांनी केली आहे.

