प्रतिनिधी:- सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण मो.7083439632
महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली राजस्थान कर्नाटक येथून येणार हजारो संख्येने आदिवासी बांधव
नाशिक :- नांदुरी येथे होणाऱ्या वैचारिक एकता महासम्मेलनाची जोरदार जय्यत तयारी करण्यात येत आहे त्याच कार्यक्रमाची आज नांदुरी येथे विविध आदिवासी बांधवांसमवेत तालुका जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली राष्ट्रीय महासम्मेलन हा सर्वात मोठा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला लाखो आदिवासी बांधव एकत्र येणार असून महाराष्ट्रतूनच नव्हे तर गुजरात दादरा नगर हवेली गोवा राजस्थान कर्नाटक या ठिकाणाहून या राष्ट्रीय महासम्मेलनाला येणार असून नांदुरी येथे मोठी गर्दी होण्याच्या अगोदरच काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे कोकणा कोकणी कुकना समितीचे केंद्रीय अध्यक्ष राम चौरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली महासम्मेलन दिनांक 23 व 24 एप्रिल रोजी भव्य दिव्य दिमाखात हा सोहळा नांदुरी येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमामध्ये तमाम आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय अध्यक्ष राम चौर व कोर कमिटी कडून करण्यात आले आहे .यावेळी महाराष्ट्र गुजरात दादरा नगर हवेली राजस्थान कर्नाटक येथिल अधिकारी पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.

