नाशिक :- महाराष्ट्रातील शेतकरी व कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या साठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी पायी लॉंग मार्च तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये शेतकरी सहभागी झाले तसेच यात शेतकऱ्यांच्या मागण्या १) कांद्याला उत्पन्न उत्पादन खर्चावर आधारित किमान आधार भाव रू २०००/ निश्चित करून लाल कांद्याला ५०० ते ६०० रूपये अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करावे २) कसणाऱ्याच्या कब्जात असलेले चार हेक्टर पऱ्यांची वन जमीन असणाऱ्याच्या नावे करून सातबारा च्या कब्जेदार सदरी असणाऱ्याचे नाव लावावे सर्वजण असणाऱ्या लायक आहे असा शेरा मारावा अपात्र दावे मंजूर करावेत तसेच देवस्थान आणि गायरान जमीन असणाऱ्याच्या नावे करा व ज्या गायरान जमिनीवर घरी आहेत ती घरे नियमित करावीत ३) शेतकरीला शेतीला लागणारी वीज दिवसात सलग बारा तास उपलब्ध करून शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावीत ४) शेतकऱ्याचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ५)२००५ नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा तसेच समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करा आणि वसंत अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मंजूर करा ६) सध्याच्या महागाईचा विचार करता गरीब शेतकरी शेतमजूर कामगार झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान रुपये एक लाख 40 हजार वरून रुपये पाच लाख करावे व वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे ड यादीत समाविष्ट करावीत ७) अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस आशा वर्कर शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायतचे डाटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक पोलीस पाटील अशा जनतेशी निगडित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतनश्रेणी लागू करावी छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्टरचे बंधारे पाजर तलाव लघुपाठव बंधारे यासारखे योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना देऊन उर्वरित पाणी बोगद्याद्वारे गिरणा व गोदावरी नदीत सोडून कळवण देवळा मालेगाव चांदवड नांदगाव येवला खानदेश आणि मराठवाड्यासारख्या महाराष्ट्रातील दुष्काळी विभागाला द्यावे ९) महाराष्ट्रात आदिवासींच्या राखीव जागावर जातीचे खोटी प्रमाणपत्र वापरून बिगर आदिवासींना नोकऱ्या बळकविल्या आहेत त्यांना नोकरीवरून कमी करून त्या जागेवर खऱ्या आदिवासींना द्यावे व आदिवासींच्या सर्व रिक्त जागा तात्काळ भराव्यात १०) महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धपकाळ पेन्शन योजनेची रक्कम १००० रुपयावरून ४००० रुपयापर्यंत वाढवावी ११) रेशन कार्ड वरील दरमहा मिळणारे मोफत धान्य सह विकतेचे धान्य पुन्हा सुरू करावे अशा प्रकारच्या मागण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी व कर्मचारी बंधू भगिनींनी या मोर्चात प्रचंड मोठ्या संख्येने सामील झाले आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून शेतकरी मोर्चा निघाला आहे तसेच मा. माझी आमदार जिवा पांडु गावित यांच्या मार्गदर्शना खाली हा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा मोर्चा विधानसभेवर धडकणार तसेच या मोर्चाला सर्व आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा देणार असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ महाराष्ट्र राज्य चे निवेदन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोनू भाऊ गायकवाड यांनि दिले व आदिवासी शक्ति सेना महाराष्ट्र राज्य सुदाम भोये नाशिक जिल्हा अध्यक्ष यांनी दिले.
विधान सभेवर शेतकर्यांचा पायी मोर्चा हजारो शेतकरी सहभागी
सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण प्रतिनिधी

