तळोदा :- दि. 27/03/2023 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने मा.आदिवासी विकास मंत्री / मा.आयुक्तालय नाशिक आदिवासी विकास विभाग नाशिक मा सह.अधिकारी प्रकल्प सो. तळोदा यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात असे म्हटले आहे की,आदिवासी विकास विभाग प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत रिक्त मुख्याध्यापक जागेवर नियुक्ती केलेल्या अधीक्षकांना तत्काळ हटवणे.आदिवासी विकास विभाग प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत बहुतांश मुख्याध्यापकाच्या जागा रिक्त असून त्या जागेवर अधीक्षक यांना नियुक्ती दिली आहे .तरी महोदय, शासनाने अधीक्षक म्हणून नियुक्ती देतांना लागू केलेले शिक्षण तथा पदावधी दरम्यानचे सोपविलेली कार्य व जबाबदारी तथापि मुख्याध्यापकाचे अध्यापन कार्यसाठी लागू केलेले शिक्षण व पदावधी दरम्यान सोपवलेली जबाबदारी यात फरक असल्याने प्रभारी म्हणून दिलेली नियुक्ती ही विद्यार्थी हित तथा शाळेतील उपशिक्षकांवर अन्याय करणारे आहे. अधीक्षकांना प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याने बहुतांश वेळा वर्ग शिक्षकांना अध्यापना दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडविणे कठीण जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास कारणीभूत ठरत आहे.तसेच बहुतांश वेळा मुख्याध्यापकाचे कार्य सांभाळताना अधीक्षक चुकीचे निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे . महोदय,ज्या ठिकाणी मुख्याध्यापकाची जागा रिक्त असेल त्या ठिकाणी तेथील वरिष्ठ शिक्षकाला , मुख्याध्यापकाचे प्रभारी पद देण्यात यावे,ही विनंती.तरी आश्रम शाळेत मुख्याध्यापक पदावर नियुक्त असलेल्या अधीक्षकाना तात्काळ हटविण्यात यावे, तथा तेथे प्राधान्याने वरिष्ठ व उप शिक्षकांना पदभार देण्यात यावा. ही विनंती. असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड गणपत पाडवी, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विशाल समुद्रे, प्रवीण दादा सुनील दादा आधी उपस्थित होते.

