बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी नाशिक जिल्ह्यात अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघाची मागणी

प्रतिनिधी:- चेतन जाधव कळवण सुरगाणा विधानसभा
नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सोनुभाऊ गायकवाड व प्रदेश कार्याध्यक्ष सुदाम भोये यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग नाशिक यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली बसवण्यात यावी व प्रत्येक कार्यालयात प्रवेशद्वार वर जन माहिती अधिकारी फलक हे पूर्ण कार्यालयात तालुक्यात लावण्यात यावे असे निवेदन केले राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असे निर्दशनास येत आहे की ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांचा कामाचा आणि वेळाचा खोळंबा होतो याला आवर करण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारी दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक ५/जानेवारी २०२३ रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर विभागीय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली लागो करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेशद्वार वर जन माहिती अधिकारी फलक हे लावण्यात यावे असे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग नाशिक यांना देन्यात आले.


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार