मुंबई :- सन 2021 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षा (मुंबई -शहर वगळता ) दि. 02/ मार्च / 2023 रोजी सकाळी (8:30 ) साडे आठ वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदासाठी विविध घटकांत ( मुबंई - शहर वगळता ) लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले असून, त्याची प्रिंट काडून घ्यावी आणि सदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी (दोन तास )अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात उमेदवारांना काही अडचणी व समस्या असल्यास त्यांनी संबंधित घटक प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा असे आवहान ( विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांनी केले आहे.

