जय बागुल / नाशिक
नाशिक :- जागतिक महिला दिनानिमित्त बिरोबाची साकुरी प्रसिद्ध असलेल्या या गावात अतिशय मोठया संख्येने महिला वर्गाने सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ कांदे उपस्थित होते.सविस्तर माहिती अशी की सौ अंजुम सुहास कांदे यांच्या उपस्थितीत साकुरी येथे जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी सौ.अंजुम कांदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित महिलांना हळदी कुंकवाचे वान भेट देण्यात आले.या नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून साकुरी गावात महिला बचत गट भवन बांधण्यात आले.असून याचे उद्घाटन सौ. कांदे, तसेच बाळू कांदे, यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सोबतच परिसरातील विविध विकासकामांचे ही उद्घाटन या वेळी करण्यात आले.या प्रसंगी धनंजय कांदे, तालुका प्रमुख पंकज निकम, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्या जगताप, संगीता बागुल,रोहिणी मोरे, सोनाली निकम,सुनीता खेमणार, वंदना शेवाळे, सीमा जाधव, मालती वाघ, सुवर्णा साळुंखे, ज्योती कदम, राणी लाड, सविता नवले, कृषी विभाग सौ काळे उज्वला माळी, अखिला शेख तसेच साकुरी गावातील व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमगाव गट प्रमुख,व महिला बचत गट ,सी आर पी सौ.मनीषा इंगळे, ग्रामसंघ प्रमुख भारती ठोके, तसेच निमगाव गटातील महिला वर्गाने मेहनत घेतली.

