रामनवमी निमित्त रावण पुतळ्याचे दहन केल्याच्या निषेधार्थ निवेदन

प्रतिनिधी - सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण
नाशिक :- रामनवमी निमित्ताने पिंपळगाव बसवंत येथे आदिवासी राजा रावण यांचे पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. हे मिडीयाच्या माध्यमातून समजताच, ज्या मंडळामार्फत असला प्रकार घडला असेल त्याच्यावर भारतीय कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे नाही तर पूर्ण आदिवासी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील म्हणून, आज रावण युवा फाउंडेशन व आदिवासी उलगुलान सेनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले, निवेदन देताना उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे व रावण युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विक्की झनकर उलगुलान सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार