नवागांव येथील स्मशानभूमीला मंजूर होऊन 3 वर्ष होऊन देखील काम सुरू नसल्याने जितेंद्र पावरा यांचे ग्रामपंचायतीला स्मरण पत्र सादर

शिरपुर :- बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव पाड्यासाठी स्मशानभूमी काम सन 2021 कृतीआराखडा मंजुरी देण्यात आली होती मंजूरी होईन 3 वर्ष पूर्ण झाले असून काम सुरू करण्यात आले नसल्याने दि :-25/2/2023 रोजी ग्रामपंचायत ला काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे बाबत जितेंद्र पावरा यांनी अर्जाद्वारे मागणी केली होती पंरतु ग्रामपंचायत ने अर्जाची दखल घेतली नसल्याने आज दि :-2/5/2023 रोजी स्मशानभूमी संदर्भात स्मरण पत्र व दुसरे निवदेन ग्रामपंचायत ला सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2021 मध्ये शासनाने 15 वा वित्त आयोग निधीतून 5 लाख 22 हजार रुपये शासनाने मंजूर सुध्दा करुन देण्यात आला होता त्याकामाचा शासनाने सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधी देऊन सुध्दा त्या कामाला 3 वर्षा झाले असून देखील आजही नवागांव येथील स्मशानभूमी चे काम सुरू करण्यातात आले नसल्याचे दिसून यते आहे. शासनाने अत्यंत आवश्यक असल्याले कामांना मंजुरी देऊन निधी सुध्दा ग्रामपंचायत ला पाठवले असुन देखील 3 वर्ष पूर्ण होऊन देखील ग्रामपंचायत कामाला सुरुवात करत नसेल तर मंजुर झालेल्या काम फक्त कागदावरच का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार