सोनिराम गायकवाड
नाशिक ग्रामीण प्रतिनिधी
आदर्श ग्रामसेवक च्या ग्रामपंचायत मधील काळा बाजारसुरगाणा :- सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजुल सु येथील नागरिकांनी ग्रामसेवक मनमानी कारभार असल्याची तक्रार पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामपंचायत करंजुल येथील रोजगार सेवक मंगल मौवज यांनी दिनांक. ३० ऑगस्ट २०२२ रोजी पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते, परंतु अजूनही ते पद रिक्त आहे, ग्रामसेवक यांना विचारले असता टाळाटाळ करत असल्याचा आरोप समस्त नागरिकांनी केला आहे, तसेच सन २०२१ ते २०२३ या कालावधीत स्वच्छता अभियानातर्गत शौचालये बांधण्यात आले असून त्यांचे मिळणारे अनुदान अजून लाभार्थाना मिळालेले नाही, ज्या लोकांनी बांधलेच नाही त्यांना अनुदान दिले. वालकंम्पाउंड सुद्धा एका महिन्यात आत करून निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे, असा सुद्धा आरोप नागरिकांनी केला आहे, तसेच घरकुल योजनेचे घर बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा अजून लाभार्थाना त्यांच्या बिलाची रक्कम मिळाली नाही, ज्या लाभर्थी नी घरच उभे नाही केले त्यांना अनुदान दिले. अहिल्यादेवी वैयक्तिक सिंचन मार्फत विहीरचा लाभ मिळूनही अद्याप पावोतो अनुदान मिळालेले नाही, अशा अनेक प्रकरच्या तक्रारी ग्रुप ग्रामपंचायत करंजूल सु मध्ये असतांना कोणत्या कामात बद्दल ग्रामसेवक यांना आदर्श ग्राम सेवक पुरस्कार दिला असे . लोकांच्या मनात रूजतंय. म्हणून नागरिकांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती सुरगाणा यांच्याकडे लेखी अर्ज देऊन चौकशी करण्यासाठी विनंती केली आहे, या लेखी अर्जावर श्री.अनिल बाळू लहरे, श्री.महेंद्र गोपाळ राठोड, श्री. शंकर गोविंदा पवार यांच्या सह्या आहेत.

