जर पत्रकाराने पत्रकारांच्या विषयी चुकीच्या माहिती या प्रसारित केल्या तर पत्रकारांवर जो समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा होईल. पत्रकारांना मानसन्मान या देशाने दिला त्याकडेही दुर्लक्ष केले जाईल तरी माझ्या वृत्तपत्राच्या व इलेक्ट्रॉनिक मीडियातील संपादकांना माझी विनंती आहे आपण कुठलाही प्रतिनिधी नियुक्ती करत असाल तर आपण तो पत्रकाराच्या नियमाचे पालन करत आहे का सुशिक्षित आहे का या गोष्टीकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. कारण याच परिस्थितीत आता काही पत्रकारांनी तो एक व्यवसाय समजून आपल्या मनमानी सारख काम करन चालू केलंय. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राचे व मीडियाचे नाव खराब होणार नाही याकडेही संपादकांनी लक्ष द्यावे.
शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात असे प्रकार दिसून येत आहेत पत्रकारांनी पत्रकारांना त्रास देऊ नये त्यासाठी मी पत्रकारांना बातमीच्या माध्यमातून माहिती प्रसारित करीत आहे .

