पालकमंत्री पदी निवड झाल्यापासून मंत्री अनिल पाटील हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर आले असून राष्ट्रवादी पक्षाचा वतीने त्यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नागरिक सत्कार सोहळ्याला विविध राजकीय यांच्या पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. यावेळी आदिवासींचे पारंपारिक शस्त्र असलेल्या धनुष्यबाण देऊन मंत्री अनिल पाटील यांचं स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी, जिल्हा कोशाध्यक्ष निखिल तुरखीया, जि.प.सदस्य मोहन शेवाले, नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, तालुकाध्यक्ष मोंटू जैन, शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, नरेंद्र नगराले, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,संजय पराडके,अलीम मक्राणी, पुंडलिक राजपूत, सुरेंद्र कुवर, संजय खंदारे, माधव पाटील, महिला प्रदेश सचिव जोशी, जिल्हाध्यक्ष सीमा सोनगीरे, महिला शहराध्यक्ष सुनीता शिंपी, गजानन वसावे, छोटू कुँवर, बबलू कदमबांडे, राजा ठाकरे, निलेश चौधरी, जेष्ठ नेते रविंद्र वळवी,धडगाव व अक्कलकुवा विधानसभा प्रभारी अध्यक्ष adv. रुपसिंग वसावे, धडगाव तालुका अध्यक्ष adv.सिना पराडके तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

