तळोदा :- दि.23/10/2023 रोजी भारतीय ट्रायबल टायगर सेना तळोदा जिल्हा नंदुरबार राज्य महाराष्ट्र यांच्या मार्फत तळोदा तालुका पोलिस उपनिरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. न्यायप्रिय महात्मा राजा रावण दहन प्रथा कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी भारतीय ट्रायबल टायगर सेना तळोदा यांनी निवेदनद्वारे केली आहे.वास्तविक महात्मा राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.तमिळनाडूमध्ये महात्मा राजा रावणाची 352 मंदिरे आहेत.सर्वात मोठी प्रतिमा मध्य प्रदेशात मंदिर चोर येथे सुमारे पंधरा मीटर उंचीची आहे. छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र व इतर पंधरा राज्यात रावणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पूजा केली जाते.महात्मा रावण हे आदिम संस्कृती श्रद्धास्थान व दैवत आहे परंतु आदिवासींच्या या क्षमता दृष्टीत समाज व्यवस्थेचा उद्राता असलेला न्यायपिर राजा रावणाला जाळण्याची खूप प्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आदिवासी समाजाचा भावना दुखावल्या जातात. महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्धी संस्कृतीचा वैभवशाली वारस्थानचा दैविक्य मान अविस्मरणीय ठेवा असून महात्मा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे.महान दर्शनी संगीत तज्ञ शिल्पकार आयुर्वेदाचार्य विवेवादी उत्कृष्ट नगर रचनाकार सामाक्षदिष्ट समाज व्यवस्थेचा गुजरात साहित्यिक न्याय राजा होता.असा गुणाचा अविष्कार करणारा महात्मा राजा रावण होता.महाराजाला इथला षड्यंतकारी वर्णार्दन व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसून ठेवली नाही.त्यास खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. परंतु सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी उघड होतो आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधन साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर आणला आहे . आदिवासी समाजामध्ये प्रचंड जनजागृती होत असताना दसऱ्याच्या दिवशी जर का रावण दहन करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी समाजाकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील त्यामुळे आदिवासी समाजाचे न्याय राजाचा अपमान करण्याचा लोकाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता 860 अंतर्गत 153 295 298 मुंबई पोलीस ऍक्ट नुसार 131 134 135 कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आमच्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी . यावेळी जितेंद्र पावरा BTTS तळोदा तालुका अध्यक्ष दिलीप पावरा BTTS तळोदा तालुका उपाध्यक्ष, मंगल पाडवी BTTS जिल्हा प्रवक्ता वसावे सुभाष BTTS तळोदा युवा उपाध्यक्ष. राजेंद्र पाडवी BTTS कार्यकर्ता अजय गावित BTTS कार्यकर्ता आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

