तळोदा:- धरतीआबा बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बिरसा फायटर्सच्या वतीने आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे पुष्पहार व पूजन करून डॉ.नरेश पाडवी (जिल्हा शल्य चिकित्सक ) ,डॉ सुलोचना बागुल (बाह्य. निवासी वैद्यकीय अधिकारी)व डॉ.रमा वाडीकर मॅडम(रक्त संक्रमण अधिकारी) जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या हस्ते उदघाटन झाले.यावेळी ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.डॉ.महेंद्र चव्हाण आरोग्य अधिकारी तळोदा व, श्री जयेश सोनवणे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व अधिकारी व कर्मचारी यांच्या विशेष सहकार्य लाभले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,प्रवक्ता दयानंद चव्हाण,प्रकाश वळवी,सामाजिक कार्यकर्ते,संघटक यशवंत वळवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,सहसचिव सतीश पाडवी,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,उपाध्यक्ष प्रदीप पटले,सचिव सुरेश मोरे,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,तळोदा शहरध्यक्ष प्रवीण वसावे,कोशाध्यक्ष हिरामण खर्डे,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,सल्लागार अड.गणपत ठाकरे,डोंगरसिंग पावरा,किरण वसावे,गुलाबसिंग पाडवी,रमाकांत वळवी,शिवदास पाडवी,जितेंद्र पावरा, उदयसिंग पावरा अशा सर्वच बिरसा फायटर्सने रक्तदान करून विशेष नियोजन केले होते.मोहन वळवी यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र पाडवी यांनी आभार मानले.
धरतीआबा बिरसा मुंडा जयंतीनिमित्त तळोदा येथे बिरसा फायटर्सच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
(३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान )

