तळोदा :- एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या शाखा फलक आवरण प्रसंगी दि 25/01/2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी यांचे प्रतिपादन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अन्याय - अत्याचार ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या एकलव्य आदिवासी युवा संघटनेची शाखा स्थापना व फलक आवरण नुकतेच गव्हाणीपाडा ता.तळोदा येथे अध्यक्ष योगेश पाडवी यांच्या हस्ते आदिवासींचे दैवत विर एकलव्य यांच्या प्रतिमाला फुलहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आले.प्रसंगी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी यांनी संघटनेचे महत्त्व ध्येय उद्देश धोरणे पेसा कायद्याचे महत्त्व बाबत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून तयार करण्यात येणारे नव-नवीन कायदे हे आदिवासीना मारक असून आरक्षणाला धोका निर्माण करणारे ठरत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे.येणाऱ्या काळात आदिवासींना विविध मानव निर्मित आपत्तींना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. तरी समाज हित जोपासणारे युवकांनी संघटनेच्या माध्यमातून संघटित लढा उभारणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी यांनी केले. यावेळी संघटनेचे विशाल नाईक संघटक तळोदा युवा उपाध्यक्ष दिनेश प्रधान शाखा अध्यक्ष योगेश पाडवी, उपाध्यक्ष अविनाश पाडवी सचिव विष्णू पाडवी अरविंद पाडवी ईश्वर पाडवी गौतम पाडवी किशोर पाडवी दीपक पाडवी हर्षल पाडवी महेश पाडवी आकाश पाडवी सुनील पाडवी गोविंद पाडवी दिगंबर पाडवी पितांबर पाडवी उमेश पाडवी करणसिंग पाडवी चंदू पाडवी निखिल पाडवी शरद पाडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

