सावित्रीबाई फुले, पुणे विदयापीठातील शिक्षणशास्त्रात सेट परीक्षेत मंगेश वाघमारे उत्तीर्ण

 

नंदुरबार :- जिल्हा परिषद, नंदुरबार येथे कार्यरत असलेले श्री मंगेश संतराम वाघमारे,‍ वरिष्ठ सहायक यांनी सावित्रीबाई फुले, पुणे विदयापीठातील शिक्षणशास्त्रात सेट परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून खान्देशात सेट परिक्षा शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण होणारे पहिलेच कर्मचारी आहेत. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून जिल्हा परिषद, नंदुरबार मधून देखील उत्तीर्ण होणारे पहिले कर्मचारी आहेत.

श्री. मंगेश वाघमारे हे यापुर्वी नंदुरबार मध्येच अक्कलकुवा तालूक्यात शिक्षक होते तसेच ग्रामसेवक ही होते. पंरतू लहानपणापासून प्रशासनातील पदाची आवड असल्याने त्यांनी वरिष्ठ सहायक हे पद स्वीकारून शिक्षक व ग्रामसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने श्री वाघमारे हे दरवर्षी एक पदवी घेत असून त्यांना आपल्या शिक्षणातून वंचित समाजाला न्याय देण्याचे स्वप्न पुर्ण करावयाचे असल्याचे त्यांनी न्यूज प्रतिनीधीशी बोलताना सांगितले.

सदर परिक्षेसाठी श्री मंगेश वाघमारे यांना नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधीकारी डॉ. युनूस पठाण, शिक्षणतज्ञ व के सागर पुस्तकांचे प्रसिध्द लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते, जिजामाता शिक्षणसंस्थेचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे व डायट धुळे येथील वरिष्ठ अधीव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार