शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह तळोदा येथे मानसिक आरोग्यावर कार्यशाळा

तळोदा :- दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत एमपावर कक्षाच्या माध्यमातून संवेदना नावाचा एक प्रकल्प सुरु आहे. त्या अनुषंगाने संवेदना प्रकल्पाचे संवाद मित्र अमोल राठोड यांनी शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह तळोदा येथे मुलांशी चर्चा करून मानसिक आरोग्यावर विविध कार्यशाळेचे आयोजन केले. 

संवेदना हा प्रकल्प सामान्य मानसिक आजारावर काम करून त्याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम करतो. आजकाल तरुणांना येत असलेल्या मानसिक तणावांचे निराकरण करण्यासाठी व मानसिक आजार ची संकल्पना त्यांना समजण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

आज आपण जर बघितले तर राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (२०१५-१६) नुसार, असा अंदाज आहे की भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे १५% किंवा सुमारे १५० दशलक्ष लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्य स्थितीसाठी तपासणीची आवश्यकता होती.  २०१९ मध्ये प्रति १००,००० लोकसंख्येमागे आत्महत्येचे प्रमाण सुमारे १६.४ असण्याचा अंदाज आहे.  एवढी तीव्र या आजाराची वाढत चाललेली संख्या दर्शविते कि यावर जनजागृती होणे किती महत्वाचे आहे. 

     या कार्यशाळेत मानसिक आरोग्याच्या संकल्पनेव्यतिरिक्त आरोग्य म्हणजे काय, शारीरिक आजार व मानसिक आजार यामध्ये फरक काय आहे आणि ते किती समांतर आहेत, मानसिक आजाराबद्दल समाजात कोणकोणते गैरसमज आहेत, कोणकोणते अडथळे आहेत, मानसिक आजाराबद्दल खरी वस्तुस्थिती काय आहे, मदत मिळविण्यामध्ये कोणकोणते अडथळे येतात, मानसिक आजाराची लक्षणे कोणती, मानसिक आजाराची कारणे, मानसिक आजारावर मदत कोणती आणि कोठे मिळू शकते, याबाबत कोणकोणत्या हेल्पलाईन आहेत, चांगले मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची या सर्व मुद्य्यांवर सविस्तर चर्चा झाली.  

कार्यशाळेत मानसिक आजार दिसून आल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कक्षात म्हणजेच नंदुरबार येथील सिविल हॉस्पिटल मधील ११२ कक्षात जाऊन योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे. जर आपले जाणे शक्य होत नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या टेलीमानस च्या १४४१६ या हेल्पलाईन वर फोन लाऊन आपल्या समस्यांचे निराकरण करावे अन्यथा एमपावर प्रकल्पाच्या १८००१२०८२००५० या टोलफ्री हेल्पलाईन वर फोन लाऊन आपल्याला समुपदेशन केल्या जाईल अशी माहिती संवेदना प्रकल्पाचे संवाद मित्र अमोल राठोड यांनी मुलांना दिली. 

या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे महाराष्ट्र राज्य हाताळणारे श्री, डीगांबर सर, धुळे जिल्ह्याचे संवेदना फेलो परवेज खाटिक, नंदुरबार जिल्ह्याचे संवेदना फेलो श्रीम. भूमिका भगत, तळोदा तालुक्याचे संवाद मित्र अमोल राठोड आणि शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल श्री. सुनील जीवने या सर्वांचा सहभाग होता.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार