तहाडी येथे दानशुर कै.भलकार बाबा पुण्यतिथी निमित्त नविन शालेय समितीचे अध्यक्षपदी किरण अहिरे व उपाध्यक्ष सतीश सोनवणे यांची निवड


 तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले आणि निस्वार्थ सेवाभावाने काम करणारे किरण माधव अहीरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सतीश सोनवणे यांची निवड झाली. या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.

ही कार्यकारिणी ग्रामगौरव असलेल्या दिवंगत कै. नथुजी सोमजी भलकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुदामजी भलकार होते. त्यांचे वडील भलकार बाबा यांनी गावातील शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी त-हाडी येथील मराठी शाळेसाठी एक एकर जागा दान दिली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ३१ जुलै रोजी शाळेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमातच नव्या शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारणीत शिक्षक तज्ञ रावसाहेब चव्हाण व सदस्य रवींद्र धनगर सोपान पाटील प्रवीण पाटील अंगणवाडी सदस्या वंदना खोंडे कविता पारधी दुर्गा भिल टिना भिल अशी निवड अधिकृत घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य, पालक प्रतिनिधी व गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर आयोजलेल्या छोटेखानी सत्कार समारंभात किरण अहीरे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना समिती अध्यक्ष किरण अहीरे यांचे विचार ,

 "शाळा ही गावाच्या प्रगतीचा पाया आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम हाच आमचा मुख्य उद्देश राहील. संपूर्ण समितीचं नेतृत्व करताना मी जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कार्य करीन."

गावातील शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, पालक सदस्य आणि ग्रामस्थांनीही आपल्या भाषणातून अहीरे यांच्या निवडीचं स्वागत केलं आणि त्यांच्याकडून शाळेच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

किरण अहीरे यांचे सामाजिक योगदान :

किरण अहीरे हे गावात स्वच्छता मोहिम, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला व युवकांसाठी कार्यशाळा, तसेच ग्रामविकास संबंधित उपक्रमांमध्ये सतत सक्रीय असतात. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांची ओळख एक प्रेरणादायी कार्यकर्ता म्हणून झाली आहे.

गावकऱ्यांच्या अपेक्षा :

नवीन समितीकडून गावकऱ्यांना अपेक्षा आहे की:

शाळेतील मुलभूत सुविधांची वाढ होईल,

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल,

गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण मिळेल,

शाळेचा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रेरणादायी बनवला जाईल.

    ही निवड तहाडी गावाच्या शिक्षण क्षेत्रात एक नवा टप्पा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला असून किरण अहीरे यांना त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अशोक बडगुजर सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार देवरे यांनी मानले,

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार