पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला अटक करा- बिरसा फायटर्सची मागणी

पत्रकाराचे अभिनंदन व धमकी देणा-यांचा निषेध- सुशिलकुमार पावरा

जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन

नंदूरबार प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र वेली तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील डाॅक्टरांची गैरहजेरी व अनास्था ची  बातमी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात पत्रकार मंगेश भिका वळवी राहणार तेलखेडी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांनी प्रसिद्ध केल्याच्या रागातून अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या आरोपीत वाण्या दौल्या वळवी राहणार वेली तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा २०१७ व २०१९ अंतर्गत गुन्ह्याचे  अधिक कलम लावून तात्काळ अटक करा व डाॅक्टर प्रदिप चव्हाण यांना सेवेतून निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,पत्रकार मंगेश वळवी, बिरसा फायटर्स जुगनी गाव  शाखेचे अमिताभ वळवी,गणपत वळवी,कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य,डाॅक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा,पोहल्या पाडवी,गुलाबसिंग पाडवी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

                          पत्रकार मंगेश वळवी यांना अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिल्याच्या घटनेचा व धमकी देणा-या आरोपी व  डाॅक्टरचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.पत्रकार मंगेश वळवी यांनी १६ जुलै २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वेली  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांची गैरहजेरी व अनास्था यावर वृत्त प्रकाशित केले होते.या बातमीचा राग मनात धरून वाण्या दौल्या वळवी रा.वेली याने दिनांक १९ जुलै २०२५ रोजी रात्री ११. ३० वाजता पत्रकार मंगेश वळवी यांना मोबाईल वरून अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .

                ही घटना धडगांव येथे होळी चौकात घडली असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आरोपी वाण्या दौल्या वळवी यांच्याविरुद्ध धडगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५१(३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार हे समाजात घडणा-या अन्याय अत्याचारांविरोधात सत्य स्थितीची बातमी प्रकाशित करून न्याय मिळवून देण्याचे लोकहिताचे चांगले काम करतात. प्राथमिक आरोग्य केंद्र वेली येथील सत्य घटनेची बातमी पत्रकार मंगेश वळवी यांनी प्रकाशित केली आहे.म्हणून पत्रकार मंगेश वळवी यांचे  हार्दिक अभिनंदन व पत्रकाराला धमकी देणा-या डाॅक्टर व आरोपी वाण्या दौल्या वळवी यांचा जाहीर निषेध. डाॅक्टर वाण्या दौल्या वळवी हे पत्रकारांचा व  सर्व सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.पत्रकारांना धमकी व गुंडगिरी आम्ही कदापी खपवून घेणार नाहीत,आरोपीला माफ करणार नाही,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार