कायदा साक्षरता काळाची गरज ! न्यायाधीश मा.श्री. प्रवीण कुलकर्णी

मोराणे, धुळे - प्रतिनिधी दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे कडील निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय, मोराणे आणि आरंभ फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी प्रत्येक जण कायद्या विषयी जागरूक असला पाहिजे आणि समाजकार्य महाविद्यालयातील कायदा साक्षर युवकच समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो असे आग्रही प्रतिपादन केले. यावेळी न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी समाज कार्य पंधरवाडा या कार्यक्रमाचे उद्घाटनही केले व अशा कार्यक्रमाची समाजामध्ये नितांत गरज आहे अशी मांडणी केली ज्यातून समाजामध्ये शांतता, सहकार्य व सुव्यवस्था निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविके च्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी समाज कार्य पंधरवाड्याची पार्श्वभूमी उपस्थितांना विशद करून दिली. तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिळणारी बौद्धिक मेजवानी अत्यंत महत्त्वाची आहे असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुकही केले व महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या अँटी रॅगिंग चळवळीची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. 

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट श्रीमती एम आर कोचर यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना जशा अशा, साथी, जागृती इत्यादी योजना विषयी सविस्तर माहिती दिली आणि कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एडवोकेट श्री. ज्ञानेश्वर महाजन यांनी बाललैंगिक अत्याचार कायदा, ड्रग अब्युज अँड ड्रग एडिक्शन, नालसा हेल्पलाइन इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

   या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा धुळे चे मा. श्री. प्रशांत महाले यांनी ट्रॅफिक रुल आणि त्यातून होणारे एक्सीडेंट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तरुणांनी अठरा वर्षाच्या आत वाहन चालवू नये. वाहन चालवताना वाहन चालवण्याचा परवाना आणि ट्राफिक रूल याची सविस्तर माहिती करून घेणे काळाची गरज आहे अशी आग्रही मांडणी केली. 

  सदरील कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन आरंभ फाउंडेशन धुळे यांच्या मदतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रा. डॉ. सुदाम राठोड, सहाय्यक महिला कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विभाग  प्रा. डॉ. फरीदा खान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रसंगी आरंभ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शेवतकर ,विधी सेवा प्राधिकरणचे मा. श्री भट यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सदरील कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आरंभ फाउंडेशनचे सचिव माननीय श्री. संजय सैतवाल यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार