भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वर्धापन दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) गटाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष श्री. रंजित (दादा) गावित

सुरगाणा:- बिवळ येथील विद्यार्थींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.*_मुलं ही देवा घरची फुलं_*या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिवळ ता सुरगाणा अति दुर्गम भागातील शाळांना नेहमी प्रमाणे तालुका अध्यक्ष श्री.रंजित (दादा) गावित यांच्या कडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या,पेन, पेन्शिल,कंपास,पाटी अंकलिपी यांसारखे उपयुक्त साहित्य देण्यात आले.

शिक्षण ही काळाची गरज आहे.या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास वाव मिळते. त्यांच्या शिक्षणाचा उत्साह वाढतो.

यावेळी समाजसेवक श्री.दिलीप राठोड, प्रकाश पवार तसेच शाळा व्यवस्थापक अध्यक्ष श्री.परसराम थोरात.सरपंच सौ.हेमलता भुसारे.ग्रामविकास अधिकारी वैष्णवी चौधरी, मुख्याध्यापक वाघमारे सर, शिक्षक भोये सर,पेसा मोबीईलझर इंदिरा भोये,पेसा अध्यक्ष हेमंत भुसारे, अंगणवाडी सेविका भागा ठाकरे, अंगणवाडी मदतनीस भारती चौधरी, आशा वर्कर लता महाले,CRP शांता पालवी,बिवळ ग्रामसंघ अध्यक्ष पूनम थोरात, होमगार्ड गुलाब थोरात, तसेच गावातील ज्येष्ठ नेते, गावकरी महादू महाले, पंडित कामठी, काशीनाथ कामडी, यशवंत वाघमारे,येवाजी थोरात, लक्ष्मण पालवी,अलका पालवी,जिजा थोरात,हिरा गावित, मनोहर महाले,सोनल कामडी,उषा कामडी,भागवत गायकवाड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते...

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार