तळोदा : दि.२४/०८/२०२५ रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हाशाखा - नंदुरबारच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मुख्यत: नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे पोहचत नाही.म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महासंघाच्या वतीने तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे.त्यात शासकीय योजनेची माहिती देणे,बचत गट स्थापन करणे,अपंग प्रमाणपत्र युडीआयडी कार्ड काढण्यासाठी मदत करणे ह्या बाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पिढीत वंचित लोकांना शासनाच्या लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणे. तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आले.विशेषत: मार्गदर्शक श्री.नानासाहेब शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष, तसेच धुळे येथील श्री.गजेंद्र कानडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला श्री.राजाभाऊ कुवर जिल्हाध्यक्ष, श्री.अजय परदेशी श्री.विनोद पगार, श्री.अरविंद शिंदे, प्रदिप बागुल, संतोष मराठे, कुवरसिंग पराडके,सलिम शेख,सौ.अर्चना पाटील, सुनिता कुवर,सारंगी पावरा व नंदुरबार, नवापूर,शहादा,तळोदा, अक्कलकुवा,धडगांव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.