अक्राणी: सुरवाणी येथुन शाळेचे विद्यार्थी हे तालुक्याच्या ठिकाणी धडगाव येथे शिक्षणासाठी 5 किमी पायपीट करून येत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी टीम यांना माहिती मिळताच थेट सुरवाणी येथे भेट दिली व विद्यार्थ्यांना सोबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून कशा प्रकारे अन्याय होत असल्याचे माहिती मिळाली व तत्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून निवेदन देण्यात आले .तालुक्याच्या ठिकाणी विद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी रोज हे विद्यार्थी बस ला थांबवत असतात परंतू जाण्यासाठी एकच बस असते. हि बस केवळ मुलींनसाठी असते .
विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही व बस ड्रायवर या ठिकाणी बस थांबवत नाही. मुल म्हणून रोज आम्ही पायपीट किती करू शासनाने एकीकडे मुलींनसाठी मोफत सेवा केली पण आमच काय आम्ही पैसे भरून पास काढू पण आम्हाला पण बस मध्ये बसवा मुलगा म्हणून जन्माला येणे चुकीच आहे का ? आम्हाला सुद्धा बसची आवश्यकता आहे हे शासनाने वेळीच लक्ष द्यावे.
अशी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली. याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी कडून निवेदनद्वारे महामंडळाला इशारा देण्यात आला आहे. जर विद्यार्थ्यांना साठी बस ची सुविधा करण्यात आली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शाळेचे विद्यार्थी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी अध्यक्ष संतोष फेंदा पावरा, इंजि.सागर पावरा, दिपक पावरा, सुदाम पावरा, गोविंद पावरा, गोपाल पावरा, (शहर अध्यक्ष) किरण पावरा, भाईदास पावरा,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.