अक्राणी(धडगाव):- तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांचे हस्ते तहसिल कार्यालय अक्राणी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश हा स्वातंत्र्य झालेला असून त्या उत्साहाने आजच्या दिवशी संपूर्ण भारतात या दिवशी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.ही माती शूर वीरांची हे स्वातंत्र्य त्यांच्या रक्ताचे, आपण त्यांचा त्यागाचे कायम ऋणी आहोत ह्याचे भान ठेवा. देशासाठी झटणं हीच खरी अभिव्यक्ती देशभक्तीची, यावेळी उपस्थित श्री. किसन गावित निवासी नायब तहसीलदार अक्राणी, श्री. अजबसिंग वळवी नायब तहसीलदार (संगायो), श्री सुभाष (आप्पा)पावरा धनाजे बुद्रुक सामाजिक कार्यकर्ता, तसेच तहसिल कार्यालय अक्राणी येथील कर्मचारी व पोलिस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते.