मोराणे, धुळे प्रतिनिधी
कविता
साक्षरतेचा प्रकाश
जिथे राही अज्ञान,
तिथे असती दारिद्र्याचे मूळ ।
या अज्ञानाला दूर करूया,
साक्षरतेची मशाल हाती घेऊया ।।
जो हाती घेई, साक्षरतेची मशाल,
तो उघडे ज्ञानाचा व्दार ।
साक्षरतेची मशाल पेटवू घरोघरी,
ज्ञानाचा झरा नेऊ दारोदारी ।।
ज्ञानाचा उधळीत गुलाल,
सर्वांना साक्षर करीत ।
या साक्षरतेच्या दिनी,
उभारू ज्ञानाची गुढी ।।
नाव :- विपुल वसंत वेडगा.
महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे