नंदुरबार :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथील गृहपाल संजय भडके (नंदुरबार वसतीगृह) व विद्यानंद खडसे (नवापूर वसतीगृह) हे सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या समाजकार्य विषयात UGC-SET परिक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
संजय भडके सर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारी (कृषी विभाग) यवतमाळ पदी नियुक्ती झाली आहे.त्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षाकेकरिता नेहमी मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या यशाबद्दल प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी साबळे साहेब,हिप्परगे मॅडम,किरण मोरे प्रकल्पातील इतर अधिकारी कर्मचारी,व सर्व गृहपाल वृदांकडुन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.