डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे पालक सभा संपन्न

 धुळे प्रतिनिधी:- प्रकाश नाईक 
मोराणे :- दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसमाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते पालक सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पालक सभेचे समन्वयक डॉ. सुवर्णा बरडे  एस. वाय. बी. एस. डब्ल्यू  च्या वर्गशिक्षक डॉ.मेघावी मेश्राम महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. गोपाळ निंबाळकर  उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून मा. हरिश्चंद्र खैरनार, मा. रंजीत वाघ, मा. प्रकाश जाधव  
एडवोकेट हितेश पाटील 
आणि प्रा. डॉ. रघुनाथ महाजन उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर सभेला उपस्थित असलेल्या संपूर्ण पालकांचं वर्गशिक्षकांद्वारे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पालक सभेचा उद्देश स्पष्ट करताना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक  मधून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद साधावा प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये आपल्या पाल्यांची  झालेली विशेष प्रगती, सांस्कृतिक विभागामध्ये मिळालेले  प्राविण्य, क्रीडा विभागामध्ये मिळालेल्या प्राविण्य  या संदर्भात माहितीचे देवाण-घेवाण व्हावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. नवीन शैक्षणिक धोरण ,महाविद्यालयातील विविध उपक्रम या संदर्भातील माहिती पालकांना मिळणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या  समस्या आणि गरजा लक्षात घेऊन त्या संदर्भात पालकांशी चर्चा करणे आणि पालकांनी विद्यार्थी विकासाच्या संदर्भात पालकांना ज्ञात करणे या उद्देशातून आजच्या या पालक सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सर्व मान्यवरांच्या स्वागत झाल्यानंतर आलेल्या प्रतिनिधी पालकांकडून महाविद्यालयासंदर्भात आणि त्यांच्या पाल्य संदर्भात आणि एकूणच महाविद्यालयाबाबत पालकांना आलेला अनुभव यासंदर्भात मनोगत व्यक्त करण्यात आले होते. यामध्ये एडवोकेट हितेश पाटील यांनी प्राध्यापकांचे आणि एकूणच महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले त्यांचे पत्नी ही या महाविद्यालयांमध्ये एम एस डब्ल्यू चे डिग्री घेत आहे तिच्यामध्ये झालेला बदल आणि शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर क्रियाकल्पामध्ये तिचा असणारा सहभाग याची सुद्धा खूप कौतुक केले. मा. रंजीत दादा वाघ यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले आहे की मी माझ्या पल्याच्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान महाविद्यालयाला आलेलो असताना महाविद्यालयाकडून पालकांना मिळणारा सन्मान हा खरोखरच माझ्यासाठी आगळावेगळा आनंद होता. महाविद्यालयाच्या परिसरात पालकांना मिळणारा एवढा सन्मान खरोखरच  कौतुकास्पद आहे. महाविद्यालयातील शिस्त आणि  महाविद्यालयामध्ये होणाऱ्या विविध क्रियाकलाप   खूपच वाखाणण्याजोगे 
आहे.  महाविद्यालयामध्ये होणाऱ्या विविध क्रियाकल्पांमध्ये माझ्या पाल्यांचा पण खूप सहभाग असतो. त्यानंतर मा. हरिश्चंद्र खैरनार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना असे स्पष्ट केले की या महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी पालक मेळावा होतो आणि प्रत्येक पालक सभेला मी उपस्थित असतो यांनी सुद्धा महाविद्यालयाच्या शिस्तीबद्दल आणि वेगवेगळ्या क्रिया कलपामध्ये विद्यार्थ्यांचा भरभरून सहभाग याबद्दल यांनीही कौतुक केले. त्यानंतर मा.प्रकाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्वतः या महाविद्यालयामध्ये घालवलेले पाच वर्ष त्याचा खूप मोठा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना सांगितला आणि हा अनुभव माझ्याकडे होता त्यामुळेच मी एक संस्थाचालक पद आज सांभाळत आहो. आज मला त्याची गरज माझ्या पत्नीसाठी वाटली म्हणून एम एस डब्ल्यू प्रथम वर्षाकरिता मी माझ्या पत्नीला या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नुसता शैक्षणिक दृष्ट्या प्रगती होत नाही तर त्याचा सर्वांगांनी विकास होतो हे त्यांनी आपल्या मनोगततून मांडले त्यानंतर पालकांसोबत मुक्त चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पालकांकडून आलेल्या सूचनांचा स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये सुधारणा होईल या यासंदर्भात पालकांना  आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना एकूणच महाविद्यालयातील  असणाऱ्या विविध समित्या आणि त्या समितीचे चालणारे कामकाज याबद्दल पालकांना माहिती दिली. शैक्षणिक वर्ष 2024 25 या कालावधीमध्ये आपल्या महाविद्यालयातील विविध क्षेत्रांमध्ये मिळालेला प्राविण्य याबाबत माहिती दिली यामध्ये क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमधील येणारे विद्यार्थी या सर्वांबद्दल सखोल माहिती देऊन अध्यक्षीय करण्यात समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती वाहने आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.सुदाम राठोड यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार